सिल्लोड, (प्रतिनिधी): नगर परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व विविध कलागुणांना वाव देण्यासाठी दिनांक ६ जानेवारी ते ७ जानेवारी दरम्यान कला क्रीडा व विज्ञान महोत्सव २६ अर्थात नगराध्यक्ष र्ग चषक शालेय क्रीडा स्पर्धा २०२५ आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. सिल्लोड नगर परिषद र प्रशालेच्या प्रांगणात हा सोहळा पार पडला. ६ जानेवारी रोजी आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते या वे क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले होते.
याप्रसंगी उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, न. प. तील शिवसेना गटनेता सुधाकर पाटील, मुख्याधिकारी कारभारी दिवेकर, नगरसेवक रउफ बागवान, रईस मुजावर, सिद्धेश्वर आहेर, अकिल वसईकर, मोहंमद नूर कुरेशी, डॉ. फेरोज खान, बबलू पठाण, सचिन पाखरे, शेख कय्युम, सय्यद पाशु आदींची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेमध्ये मोठ्या उत्साहाने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला व विविध स्पर्धांचे बक्षीस मिळविले. सर्वाधिक पदकाची कमाई करणारी शाळा नगर परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळा सिल्लोड या शाळेला नगराध्यक्ष चषक २०२६ देऊन नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सन्मानित केले.
याप्रसंगी अब्दुल समीर यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षण विभाग प्रमुख व शिक्षकांचे अभिनंदन करून येत्या काळात सर्व शाळा व विद्यार्थी विकासासाठी अत्याधुनिक सोयी सुविधा, सवलती नगर परिषदे मार्फत दिल्या जातील. अत्याधुनिक भौतिक सुविधायुक्त नववास्तूचे लोकार्पण केले जाईल, असे आश्वासित केले. उपमुख्याधिकारी अजगर पठाण, मुख्याध्यापक नारायण चव्हाण किशोर जगताप, सदाशिव बडक, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी व मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होते.